EMS २०१६
युरोपातल्या मराठी लोकांचा मराठमोळा सोहळा म्हणजेच युरोपीय मराठी संमेलन! मराठी कलासृष्टीतील आपल्या आवडत्या कलाकारांची साथ आणि संपूर्ण युरोप येथील इच्छुक कलाकारांच्या कलेला वाव मिळवून देणारं एक आगळ वेगळ मराठी संमेलन.
यंदा तिसऱ्यांदा हॉलंड येथे सादर होणार आहे EMS, (तत्पूर्वी १९९८ आणि २००६ साली हॉलंडने EMS चे यजमानपद भूषविले आहे) एका नव्या स्वरुपात, तरुणाईच्या जल्लोषात, विविध कार्यक्रमांसोबत, पारंपारिक डच आदरातिथ्यासोबत आणि अस्सल मराठी पदार्थांसोबत.
EMS च्या मूळ कार्यकर्त्यांसोबतच अनेक नवीन हात आणि त्यांची साथ आम्हाला लाभली. पण EMS ला जन्म देणारे डॉ. आनंद पांडव हे नेहमीच प्रेरणेच्या रुपात आमच्या सोबत आहेत. पहिलं संमेलन १९९८ साली हॉलंड येथेच पार पडल. त्यावेळी त्याची संकल्पना आणि संयोजन हे डॉ. पांडव ह्यांचं होत. ह्या संमेलनामागचा मुळ उद्देश एवढाच कि
“युरोप मधील सर्व मराठी बांधवांनी सोबत यावे, आपल्या कलागुणांना सर्वासमोर सादर करावे, इतरांच्या कलांविषयी जाणून घ्यावे अन असेच एकमेकांचे प्रेम वृद्धिंगत व्हावे.”
याच हेतूने पुन्हा एकदा आम्ही तयारीला लागलोय. तुम्हीही आमची साथ द्याल याची संपूर्ण खात्री आहे.
तेंव्हा सज्ज होऊयात या महोत्सवाकरिता आणि मराठी संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याकरिता. तुमच्यातील सुप्त गुणांना जागे करा आणि मनमोकळे पणाने आनंद लुटा EMS २०१६ चा.
दिनांक : १५, १६, १७ एप्रिल २०१६
स्थळ : थिएटर हॉटेल अल्मलो
अधिक माहितीसाठी भेट दया- http://www.ems2016.nl